डाएट म्हणजे…? (केतकी इतराज Sunday, January 02, 2011)

कुणाला वाटत नाही आपण “फिट’ असावं? शिडशिडीत असावं? पण त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूपच कमी जणांची असते….व्यायाम, चालणे-धावणे वगैरे सोडा; आपल्या रोजच्या आहारात जरी काही पथ्ये आपण पाळली तरी “तुंदिल तनू’ बरीचशी आटोक्‍यात राहील…सुयोग्य आहाराद्वारे ती आटोक्‍यात कशी ठेवायची, ते शिका या चुरचुरीत सदरातून !!                                                                                                                          

 

            प्रसंग साधासा…मंडईतून फेरफटका मारताना खूप जुन्या ओळखीचे काका समोर दत्त म्हणून उभे. वडिलांशी अगदी अरे-तुरेच्या गप्पा सुरू झाल्या. मग माझ्याकडे पाहून आश्‍चर्यानं उद्गारले ः “अरे! एवढीशी असताना खांद्यावर खेळवले होते मी हिला. केवढी मोठी झाली ! काय करते सध्या?’
“डाएटिशियन (आहारतज्ज्ञ) आहे,’ असे सांगताच, “अरे वा! घरी सगळ्यांनाच डाएटवर ठेवले नाहीस ना गं!’ असे मिस्किलोद्गार “टाकुनिया बाबा गेला!’
बाहेरचंच काय, अगदी आमच्या घरच्यांचच ढळढळीत उदाहरण घ्या ना! अधिक मासाचा कार्यक्रम. साग्रसंगीत श्रीखंड-पोळी, बटाट्याची भाजी, पहिला साधा भात, शेवटचा मसाला भात, तुपाची धार…अगदी मराठमोळा मेनू. शिवाय आग्रह करणारे एक से एक महारथी. माझ्याकडे कटाक्ष टाकूनच,”आमच्या डाएटिशियनला चालतं ना!’ असे म्हणून सर्वत्र हास्यकल्लोळ.मी आपली हसावं की रडावं या विचारात. “वळू’मधला “फारिष्ट’सारखं लोकांनी “डाएट’वरून टाकळलं. डबा ग्रुपसुद्धा,” ती हे घेणार नाही, त्याचं तिचं डाएट असतं’ अशी फिरकी घेणारा! खरं तर वास्तविक पाहता डाएट या शब्दामागं एक छानशी संज्ञा आहे. “डाएटिक्‍स’ म्हणजे आहारशास्त्र! असं शास्त्र की जे आयुष्यातील विविध टप्प्यांवर आहाराची पूरकता, परिपक्वता आणि रोगाच्या अवस्थेनुसार अन्नातील आवश्‍यक बदल सुचवतं. Continue reading

जाऊ नका ‘जंक फूड’च्या ‘आहारी’! (केतकी इतराज,Sunday, February 20, 2011)

सेच एकदा एक आजोबा या सदरातील माझ्या लेखावर अभिप्राय देण्यासाठी आले. वार्धक्‍यातही त्यांचा चेहरा प्रसन्न होता. शरीरयष्टी उत्तम होती. आहाराविषयीची त्यांची आस्था कळण्यासाठी या गोष्टी पुरेशा होत्या. खाऊच्या बटव्यातून वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ काढावा, तसे एक से एक किस्से सांगत आमच्या गप्पा रंगत होत्या. पण सरतेशेवटी आजोबांची एकच खंत होती व ती म्हणजे ः “आमच्या वेळी नव्हतं हो असं!’

ते गेल्यावर मी त्यांच्या या वाक्‍यावर विचार करू लागले. तेव्हा ते मलाही पटलं खरं! पूर्वीची जीवनशैली, अंगमेहनतीची कामं यामुळं भूकही कडकडून लागायची. साधा; पण सकस आहार असायचा. “अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणून त्याचं सेवन केलं जायचं. आजकाल मात्र खाण्याबाबतच्या आवडी-निवडींबाबत काही सांगायलाच नको. जिभेचे कितीही चोचले पुरवले तरी लाडावलेल्या मुलांची तोंडं वेंगाडलेली ती वेंगाडलेलीच…! विचार करता करता मी मलाच प्रश्‍न विचारला ः “खरंच! काहीतरी चुकतंय आपलं, असं नाही वाटत?’ Continue reading

विद्यार्थी-मित्रांनो, आहाराची “परीक्षा’ घेऊ नका! (केतकी इतराज,Sunday,March 13, 2011)

फेब्रुवारी महिन्यातली आमच्या घरातली एक Routine सकाळ. सकाळच्या लगबगीत आणखी एक घाई ; ” लवकर निघा, उन्हं डोक्‍यावर आलीत…’! खरंच की ! आत्ता-आत्तापर्यंत घुटमळणारी थंडी कधी पळाली कळलंच नाही! भल्या सकाळी लख्ख तळपणारा सूर्य चाहूल देत होता जणू
“उन्हाळा आला..!’
उन्हाळा म्हणजे डोळ्यांसमोर येते ती धमाल सुट्टी, रसाळ हापूस…पण त्याआधी “परीक्षा’
चिमुकल्यांना लागणारे हे सुट्टीचे वेध मोठ्या ताई-दादांसाठी मात्र एक tension घेऊन येतात. Continue reading