‘फूड पिरॅमिड’चा तोल सांभाळा! (केतकी इतराज, Sunday, February 06, 2011 )

चौरस आहार / समतोल आहारामध्ये सुमारे 55 ते 60 टक्के कर्बोदके, 15 ते 20 टक्के प्रथिने आणि दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक स्निग्ध पदार्थ असावेत. हे प्रमाण निरोगी माणसाच्या संतुलित आहाराचे आहे. प्रकृतीच्या समस्यांनुसार यात बदल होणार, हे ओघानेच आले.चौरस आहाराचे हे गणित सोडवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे “संतुलित आहाराच्या त्रिकोणाचे’ (Food Pyramid) पालन!
                  Food Pyramid / संतुलित आहाराचा त्रिकोण खरोखरीच आकर्षक रंगसंगतीद्वारा व चित्ररूप संकल्पनेने लहान-मोठ्या साऱ्यांनाच आहाराचे बारकावे समजावून सांगण्यात यशस्वी होतो. या त्रिकोणाचा पाया असणारी तृणधान्ये आपल्याही संतुलित आहाराचा पायाच म्हणायला हवीत. बहुतांश वेळा यातील काही अन्नघटक हे आपले “प्रमुख अन्न’ असतात.उदाहरणार्थ  Continue reading

संक्रांत घेते ‘डाएट’ची काळजी!(केतकी इतराज Sunday, January 16, 2011, सकाळ,सप्तरंग)

ववर्षाची गोड, मधुर, रंगीबेरंगी सुरवात करणारा सण म्हणजे मकार संक्रांत. “तीळ-गूळ घ्या; गोड बोला’ म्हणत झाले-गेले विसरून जायला लावत नात्यांमधील काटेरीपणातही तिळाची स्निग्धता हा सण आणतो.
लाल-हिरव्या-निळ्या-नारिंगी अशा वेगवेगळ्या रंगांचा आणि अगदी हलकासाच बोचणारा गोड गोड हलवा ही तर लहानग्यांसाठी केवढी मौज!महाराष्ट्रातील ही संक्रांत दक्षिण भारतात आणि देशाच्या इतर भागांतही विविध नावांनी साजरी केली जाते. आपल्या महाराष्ट्रात रंगीबेरंगी हलवा, तीळ-गुळाची वडी, गुळाची पिवळीधमक पोळी आणि त्यावर चमचाभर साजूक तूप…असा जय्यत बेत असतो. दक्षिणेकडेही पोंगल हा विशेष पदार्थ तयार केला जातो. Continue reading

शाकाहाराला द्या दुधाची जोड (केतकी इतराज, Sunday, January 30, 2011, सकाळ,सप्तरंग)

शाकाहारी असणं आरोग्याला लाभदायक ठरतं, यावर शक्‍यतो दुमत नसावं. Cholesterol-free राहण्याचा तो हमखास उपाय आहे, हे तर आपण पाहिलंच; परंतु शाकाहारी नसलेल्या लोकांचं काय?मांसाहार पूर्णतः वाईट आहे का, असे तेही विचारणारच! प्रथिनांचा अत्यंत उत्कृष्ट स्रोत म्हणजे मांसाहार. अगदी बरोबर! पण मग आता यातून सुवर्णमध्य काय? प्रथिनांची गरजही भरून काढली जावी, मेद आणि चरबीही वाढू नये असा आहार घेणे!केवळ शाकाहार म्हणजे काहीजण कोणतेच प्राणिजन्य पदार्थ सेवन करत नाहीत. अगदी दूधही नाही! अर्थातच प्रचंड प्रमाणात कॅल्शियमची कमतरता त्यांच्यात दिसून येते. या आहारात वनस्पतीजन्य पदार्थ अधिक असल्याने तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते व त्यामानाने मिळणारी ऊर्जा कमी. लहान मुलांच्या ऐन वाढीच्या वयात आवश्‍यक उष्मांक देण्यास ही आहारप्रणाली अपुरी ठरते. या आहारप्रणालीत इ2 जीवनसत्त्वाची हमखास कमतरता आढळते. या शाकाहाराला दुधाची जोड मिळाल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघतेच; शिवाय चांगल्या प्रतीची प्रथिनेही शरीराला देता येतात. मात्र, लोह, ड जीवनसत्त्व यांचे पुरेसे शोषण करणे हे केवळ वनस्पतीजन्य स्रोतांमधून अपुरे ठरते. म्हणूनच आपल्या आहारात दूध, दही, ताक व इतर दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण पुरेसे असावे. यांमुळे कॅल्शियम, प्रथिने, काही प्रमाणात इ12 जीवनसत्त्वाचा समावेश शक्‍य होतो. आपल्या सुजलाम्‌-सुफलाम्‌ देशावर सूर्यदेवाची कृपादृष्टी तर आहेच! यामुळे ड जीवनसत्त्व शरीरात तयार होऊन हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. काही विशिष्ट मिश्रणांन्वये प्रथिने शाकाहारी असूनही त्यांची गुणवत्ता वाढवता येऊ शकते, हे आपण गेल्या काही भागांत पाहिले आहेच. डाळी, कडधान्यांबरोबरच उकडलेले अंडे हा प्रथिनांचा पूरक स्रोत ठरू शकते.
मांसाहारी लोकांनी मांसाहाराचे सातत्य कमी करून कमी तेलात शिजवलेले चिकन / मासे खाल्ल्यास अतिरिक्त स्निग्धांशापेक्षा उत्तम दर्जाच्या प्रथिनांचा त्यांना खऱ्या अर्थानं लाभ घेणं शक्‍य होईल. Continue reading

फॅट्‌सचा समतोल साधतो शाकाहार (केतकी इतराज, Sunday,January 23, 2011, सकाळ,सप्तरंग)

पल्या आहारातून स्निग्ध पदार्थ; अर्थातच फॅट्‌स वर्ज्य करण्याची आवश्‍यकता नाही. हे वाचून कित्येकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतील.
अतिमहत्त्वाच्या इंद्रियांभोवती संरक्षक कवच असतेच; त्यामुळे स्निग्ध पदार्थ खाऊन केवळ आणि केवळ कोलेस्टेरॉल वाढते. बापरे! कोलेस्टेरॉल! काय भयंकर, भारदस्त आणि वजनदार शब्द आहे! शब्द ऐकूनच हृदयाचा ठोका चुकावा.आजकाल लग्न करू इच्छिणारी मुले, “मुलगी चांगली शिकलेली हवी’, असे सांगतात; तसेच साऱ्यांचा कल ‘Cholesterol-free’  या शब्दाकडे असतो. खरंच, इतके वाईट आहे का कोलेस्टेरॉल?खरेतर Sterol नामक एक रासायनिक घटक आहे, जो वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळतो. Continue reading

पुरेशी कर्बोदके आवश्‍यकच! केतकी इतराज(Sunday, January 09, 2011 ,सकाळ , सप्तरंग)

शरीराची झीज भरून काढणे, प्रतिकारक्षमता वाढवणे ही प्रथिनांची प्रमुख कार्ये होत. कर्बोदकांप्रमाणेच एक ग्रॅम प्रथिने साधारणपणे चार उष्मांक देतात. मात्र, प्रथिनांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात पुरेशी कर्बोदके असणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
हारशास्त्रातील डाएटनंतरचा सर्वात लोकप्रिय शब्द म्हणजे “कॅलरीज्‌’! कॅलरीज्‌ हा शब्द संभाषणात वापरणं, शब्दाची सध्या फॅशन आहे, असं म्हटलं तरी योग्यच ठरेल. आजकाल बऱ्याच पाककृती लो कॅलरीज्‌ म्हणून सर्वांनाच आकर्षित करत आहेत. या लोकप्रिय शब्दाचा मराठी अनुवाद म्हणजे “उष्मांक’! एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्यातील अन्नघटकांपासून शरीराला मिळणारी ही ऊर्जा. आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आपले वजन, जीवनशैली, कामाचे स्वरूप आणि इतर वैद्यकीय समस्या यावर अवलंबून असते.या उष्मांकाचे प्रमुख स्रोत म्हणजे कर्बोदके अर्थात कार्बोहायड्रेट्‌स! एक ग्रॅम कर्बोदके सुमारे चार कॅलरीज्‌ देतात. आपल्या आहरातील तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका यांसारखी तृणधान्ये, पिष्ठमय पदार्थ, गोड पदार्थ, कंदमुळे या कर्बोदकांचे प्रमुख स्रोत होय. शरीराच्या विविध कामांसाठी Continue reading