फॅट्‌सचा समतोल साधतो शाकाहार (केतकी इतराज, Sunday,January 23, 2011, सकाळ,सप्तरंग)

पल्या आहारातून स्निग्ध पदार्थ; अर्थातच फॅट्‌स वर्ज्य करण्याची आवश्‍यकता नाही. हे वाचून कित्येकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतील.
अतिमहत्त्वाच्या इंद्रियांभोवती संरक्षक कवच असतेच; त्यामुळे स्निग्ध पदार्थ खाऊन केवळ आणि केवळ कोलेस्टेरॉल वाढते. बापरे! कोलेस्टेरॉल! काय भयंकर, भारदस्त आणि वजनदार शब्द आहे! शब्द ऐकूनच हृदयाचा ठोका चुकावा.आजकाल लग्न करू इच्छिणारी मुले, “मुलगी चांगली शिकलेली हवी’, असे सांगतात; तसेच साऱ्यांचा कल ‘Cholesterol-free’  या शब्दाकडे असतो. खरंच, इतके वाईट आहे का कोलेस्टेरॉल?खरेतर Sterol नामक एक रासायनिक घटक आहे, जो वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळतो. वनस्पतींमधील डींशीेश्री ला फायटोस्टेरॉल, मायोस्टेरॉल अशी नावे आहेत; तर प्राण्यांमध्ये आहे ते कोलेस्टेरॉल! रक्तातील नैसर्गिक स्निग्ध आणि कोलेस्टेरॉल हे काही अंशी आपल्या अन्नातून येतात व काही आपल्या आतड्यांमध्ये तयार झालेली असतात. पाण्यात न विरघळणारी असल्याने लायपोप्रोटीननामक घटकाच्या साह्याने ते शरीरात इतरत्र वाहून नेले जातात. आपल्या शरीरातील महत्त्वाची हार्मोन्स बनविण्यासाठी कोलेस्टेरॉल हा कच्च्या मालासारखा वापरला जातो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या हार्मोन्समध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉल यांसारख्या प्रजननासाठी (लिंग ठरण्यासाठी) अत्यावश्‍यक हार्मोन्सचाही समावेश होतो.आपल्या त्वचेमध्ये व इतरत्र असणाऱ्या याच कोलेस्टेरॉलरूपी पदार्थाचे सूर्यकिरणांमुळे “ड’ जीवनसत्त्वात रूपांतर होते आणि हाच “ड’ जीवनसत्त्वाचा सर्वोत्तम स्रोत आहे, हे बहुतेक साऱ्यांना ठाऊक असतेच! याच कोलेस्टेरॉलचे चांगले रूप (HDL Cholesterol) शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉलची हकालपट्टीदेखील करते. त्यामुळेच शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढू नये, यासाठी स्निग्ध पदार्थ कोलेस्टेरॉल स्वरूपात घेणे टाळावे. सुरवातीच्या काही ओळी लक्षात असतील तर त्यांचे उत्तर आपल्याला लगेच कळले असेलच : प्राणिजन्य मांस कमी खाणे किंवा न खाणे. अर्थातच, सर्व शाकाहारी पदार्थ Cholesterol-free असतात.  So, ‘Be Vegetarian! (Not Cholesterol-free!!)

Please follow and like us: